Cover Image of डाउनलोड Eknathi Bhagwat (एकनाथी भागवत) 1.0.0.1 APK

4.1/5 - 33 वोट

ID: com.ndss.eknathibhagwat

अभी एपीके डाउनलोड करें

का वर्णन Eknathi Bhagwat (एकनाथी भागवत)


एकनाथी भागवत हा नाथांचा अत्यंत महत्त्वाचा, सर्वांगसुंदर आणि लोकप्रिय असा ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे महाराष्ट्रातील भागवत धर्माच्या, श्री ज्ञानेश्वरांनी उभारलेल्या मंदिराचा आधारस्तंभ होय, असे बहिणाबाईंनी एका अभंगांत म्हटले आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयींत त्याला पहिले स्थान आहे. एकनाथी भागवत प्रथम वाचून समजून घेतले म्हणजेच ज्ञानेश्वरींतील प्रमेयाचा अर्थ नीट कळतो. एकनाथी भागवताशिवाय ज्ञानेश्वरी संपूर्ण समजत नाही असे म्हणतात. शास्त्रसुधारक विष्णुशास्त्री बापट यांनी केलेले मराठी भाषांतर फारच छान आहे.

एकनाथी भागवत हा एकनाथांचा एक महत्त्वाचा ग्रंथ असून वारकरीपंथास आधारभूत आहे. संस्कृतमधील भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील ही ओवीबद्ध मराठी टीका आहे. त्याची रचना इ.स. १५७० ते इ.स. १५७३ या काळात झाली. सत्ताविसाव्या अध्यायात पूजाविधी आहे. सर्वांभूती समानता आणि भगवद्‌भाव हे नाथांच्या शिकवणीचे सार म्हणून सांगता येईल. भक्तीच्या द्वारे परमार्थाची प्राप्ती करून घेण्याच सुलभ मार्ग प्रापंचिकांपुढे ठेवणे, हे या ग्रंथाचे प्रयोजन होते. आपल्या गुरूच्या आदेशावरून या ग्रंथाची रचना केल्याचे एकनाथ सांगतात. पैठण येथे असताना त्यांनी पाच अध्याय लिहिले. एकनाथांच्या एका चाहत्याने काशीस जाताना ते पाच अध्याय सोबत नेले. भागवत ग्रंथाचा हा प्राकृत अवतार पाहून काशीक्षेत्रात विद्वानांना क्रोध आला आणि त्यांनी एकनाथांना काशीस बोलावून घेतले. तेथे त्यांनी काशीच्या मणिकर्णिका घाटावर संपूर्ण भागवताची रचना केली आणि ती विद्वज्ज नांपुढे मांडली. तेथे हा ग्रंथ विद्वज्जनांच्या पसंतीस उतरला आणि त्या ग्रंथाची त्याच विद्वज्जनांनी काशी मध्ये मिरवणूक काढली.

नाथांचा जन्म संत भानुदासांच्या कुळामध्ये देशस्थ ऋग्वेदी आश्वलायन ब्राह्मण कुटुंबात झाला. नाथांचे मातापिता नाथांच्या बालपणात निवर्तल्यामुळे आजी आजोबांनी नाथांचा सांभाळ केला. बालपणापासूनच नाथांना भगवद्‍भक्‍तीचे वेड. गुरुकृपेने भगवंताची भेट होते हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी आकाशवाणीच्या निर्देशाप्रमाणे नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे जनार्दन स्वामी नावाचे दत्‍तभक्‍त किल्लेदार म्हणुन होते. नाथांनी त्यांना पाहताच सद्‍गुरू मानून मनोभावे सेवा केली. नाथांची सेवा पाहुन स्वामींनी त्यानां शिष्य म्हणुन स्वीकारले. स्वामी प्रत्येक गुरुवारी किल्ल्याच्या शिखरातील गुहेत दत्‍तध्यान करीत. एके दिवशी स्वामी ध्यानात असताना परकीयांचे आक्रमण झाले. सद्‍गुरुंची समाधी भंग होऊ नये म्हणुन नाथ हाती तलवार घेवून घोडयावर स्वार झाले. लढाई केली आणि शत्रुंचा पराभव केला. निस्सिम सेवेने नाथ दत्‍तात्रय दर्शनास पात्र झाल्याचे पाहुन शुलिभंजन पर्वतावर त्यांना पहिले दत्‍तदर्शन स्वामींनी घडविले. पुढे तीर्थयात्रा करुन नाथ पैठणास पोचले.

सद्‍गुरुंच्या आदेशाप्रमाणे पैठण येथेच वास्तव्य करुन नाथ गृहस्थाश्रमात प्रवेश करते झाले. नाथांची पत्नी गिरिजाबाई ह्या सुशील आणि तत्पर होत्या. त्यांना तीन अपत्ये झाली. गोदा, हरिपंडीत व गंगा. नाथांचा प्रपंच व परमार्थ हे दोन्हीही फुलू लागले. संस्कृतातील ज्ञान सर्वसामान्यांना कळावे या उद्देशाने त्यांनी ते मराठीत सांगण्यास सुरुवात केली. त्यावरुन त्यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला. परंतु त्यास न जुमानता लोकोद्धारार्थ नाथांनी लोकांच्याच भाषेत भारुडादींच्या मार्गाने लोकांना परमार्थमार्गास लावले. लोकोद्धारासाठी वाङमयाच्या व आचरणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केले.

त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. नाथांची भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण ३६ वर्षे श्रीखंड्या, केशव व विठ्ठल नावाने नाथांघरी राबला. भगवान दत्तात्रयांनी नाथांच्या दारी द्वारपाल म्हणुन काम केले. नाथवाड्यात नित्य कीर्तन प्रवचनादी रोज होत असत.

एक दिवस नाथ सर्वसामान्यांसारखे मरण पावले. लोक म्हणू लागले नाथ सर्वसामान्यांसारखेच गेले मग त्यांच्यात आणि आमच्यांत काय फरक? नाथ ताटीवर उठुन बसले म्हटले मी पुन्हा केव्हातरी जाईन. काही दिवसांनी फाल्गून वद्य षष्ठी शके (इ.स. १५३३ ते १५९९) हा दिवस नाथांनी जलसमाधीसाठी निश्चित केला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत नाथांनी लक्ष्मीतीर्थावर शेवटचे कीर्तन केले. कृष्णकमलतीर्थामध्ये नाभिपर्यंत पाण्यात जावून आत्मा ब्रह्मांडात विलीन केला. त्यांच्या पार्थिव देहावर हरिपंडीतांच्या हस्ते अग्नी देण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी गरम राखेवर तुळशी आणि पिंपळाचे रोप उगवले. त्यावरच नाथपुत्र हरिपंडीतांनी चरण पादुकांची स्थापना केली. प्रतिवर्षी एकनाथषष्ठी उत्सवास पाच ते सात लाख भाविक पैठणमध्ये येतात. आजही जे भाविक नाथांचे मनोभावे दर्शन घेतात त्यांना नाथ शांती, भक्ती आणि श्रीमंती प्रदान करतात.
और दिखाओ

Eknathi Bhagwat (एकनाथी भागवत) 1.0.0.1 APK के लिये Android 4.1+

संस्करण 1.0.0.1 के लिये Android 4.1+
अपर अद्यतन 2021-02-13
इंस्टॉल 1.000++
फाइल का आकार 5.136.681 bytes
अनुमतियां अनुमतियाँ देखें
नया क्या है - New UI
- Added Eknathi Bhagwat in Text
- Fixed Bug

हिट APK
और दिखाओ